मंगळवार, २५ जुलै, २०२३

कुणीतरी हवं असतं...../मैत्रीण/ मित्र/ कविता


 



....💟कुणीतरी हवं असतं.💟....

कुणीतरी हव असत ,जीवनात साथ देणार

हातात हात घेऊन , शब्दांशिवाय बोलणार....


कुणीतरी हव असत ,जीवाला जीव देनार

फुलातल्या सुगंधासारख,आयुष्यभर जपणारं......


कुणीतरी हव असत ,हक्कान रागवणार,

चुका झाल्या तरी,मायेन समज़ावनारं........


कुणीतरी हव असत ,आपल म्हणणारं

नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओळखणार........


कुणीतरी हव असत ,बरोबर चालणार,

कशीही वाट असली तरी,मागे न फिरणार........


कुणीतरी हव असत ,वास्तवाच भान देणार,

कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासोबत रमणार......


कुणीतरी हव असत,मनापासुन धीर देणार,

स्वतःच्या दुखाःतही,मला सामावुन घेणार.........


कुणीतरी हव असत,एकांतही रेंगाळणार,

माझ्यासोबत नसतानाही,मझ्यासोबतच असणार....


कुणीतरी हव असत,विश्वास ठेवणार,

माझ्या विश्वासाला कधीही न फसवणार...........


कुणीतरी हव असत,मला समजुन घेणार,

आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार............



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी स्टेटस | mαrαthí ѕtαtuѕ | lσvє ѕtαtuѕ | lєtєѕt mαrαthí ѕtαtuѕ | 1000 mαrαthí ѕtαtuѕ

   मराठी स्टेटस  तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्य...