नवरा-बायकोच्या नात्यांची
अलगद गुंफण करणारी कविता
काल वाचनात आली..
❤तो तिला म्हणाला “डोळ्यात
तुझ्या पाहू दे”..
ती म्हणाली “पोळि करपेल,
थांबा जरा राहू दे”...
💙तो म्हणाला “काय बिघडेल
स्वयंपाक नाही केला तर..?
”ती म्हणाली ”आई रागावतील,
दूध उतू गेल तर'..
👪“ठीक आहे मग दुपारी
फिरून येवू, खाऊ भेळ”
“पिल्लू येईल शाळेतून,
पाणी यायची तीच वेळ”
💑“बर मग संध्याकाळी आपण
दोघेच पिक्चर ला जावू”..
“नको आज काकू यायच्यात,
सगळेजण घरीच जेवू”...
💌“तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट”...
“बघा तुमच्या नादामधे
भाजी झाली तिखट”..
💏आता मात्र तो हिरमुसला,
केली थोडी धुसफूस
ऐकू आली त्याला सुद्धा
माजघरातून मुसमुस..
💔सिगरेट पेटवत, एकटाच तो
निघून गेला चिडून...
डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून..
💓दमला भागला दिवस संपला
तरी अबोला संपेना
सुरवात नक्की करावी कुठून
दोघांनाही कळेना...
💕नीट असलेली चादर त्याने
उगीच पुन्हा नीट केली..
अमृतांजन ची बाटली तिच्या
उशाजवळ ठेवून दिली..
💖तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर'..?
आणि तो विरघळला।
💗“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून
किती सिगरेट्स ओढल्यास सांग”..
💚“माझी सिगरेट जळताना तुझ जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव
जाळण आठवल...
💙अपेक्षांच ओझ तू किती
सहज पेललस सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेललस…
💛तुला नाही का वाटत कधी
मोकळ मोकळ व्हावसं
झटकून सगळी ओझी पुन्हा
तुझ्या जगात जावस'..
💜“बोललास हेच पुरे झाल…
एकच फ़क्त विसरलास…
💘माप ओलांडून आले होते,
तेव्हाच माझ जग
तुझ्या जगात नाही का
विरघळलं'...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा