सोमवार, २४ जुलै, २०२३

नवरा असा असतो....

आता पर्यंत बायको वरील कविता ऐकली असेल व वाचली असेल पण नवऱ्या वरील एकदा वाचा 

*नवरा म्हणजे समुद्राचा
*भरभक्कम काठ 
*संसारात उभा राहतो
*पाय रोवून ताठ      ll

*कितीही येवो प्रपंच्यात
*दुःखाच्या लाटा
*तो मात्र शोधीत राहतो
*सुखाच्या वाटा   ll    

*सर्वांच्या कल्याणा करता
*पोटतिडकीने बोलत राहतो
*न पेलणारं ओझं सुद्धा
*डोक्यावर घेऊन चालत राहतो  ll

*कधी कधी बायकोलाही
*त्याचं दुःख कळत नसतं
*आतल्या आत त्याचं मन
*मशाली सारखं जळत असतं  ll

*नवरा आपल्या दुःखाचं
*कधीच प्रदर्शन मांडत नाही
*खूप काही बोलावसं वाटतं
*पण कुणाला सांगत नाही   ll

*बायकोचं मन हळवं आहे
*याची नवऱ्याला जाणीव असते
*दुःख समजून न घेण्याची
*अनेक बायकात उणीव असते  ll

*सारं काही कळत असून
*नवऱ्याला अपमान गिळावे लागतात
*वेदनांना काळजात दाबून
*पुन्हा कष्ट उपसावे लागतात    ll

*सगळ्यांच्या आवडी जपता जपता
*मन मारीत जगत असतो
*बायको , पोरं खूष होताच
*तो सुखी होत असतो  ll

*इकडे आड तिकडे विहीर
*तशीच बायको आणि आई
*वाट्टेल तसा त्रास देतात
*कुणालाच माया येत नाही ll

*त्याने थोडी हौसमौज केली तर
*धुसफूस धुसफूस करू नका
*नवऱ्या विरुद्ध विनाकारण
*दारू गोळा भरू नका  ll

*दोस्ता जवळ आपलं मन
*त्यालाही मोकळं करावं वाटतं
*हातात हात घेऊन कधी
*जोर जोरात रडावं वाटतं ll

*समजू नका नवरा म्हणजे
*नर्मदेचा गोटा आहे
*पुरुषाला काळीज नसतं
*हा सिद्धांत खोटा आहे  ll

*मी म्हणून टिकले इथं
*दुसरी पळून गेली असती
*बायकोनं विनाकारण
*नवऱ्याला धमकी दिलेली असती ll

*घरात तुमचं लक्षच नाही
*हा एक उगीच आरोप असतो
*बाहेर डरकाळ्या फोडणारा
*घरी म्यांव म्यांव करीत बसतो ll

*सारख्या सारख्या किरकिरीनं
*त्याचं डोकं बधिर होतं
*तडका फडकी बाहेर जाण्यास
*खूप खूप अधीर होतं  ll

*घरी जायचं असं म्हणताच
*त्याच्या पोटात गोळा येतो
*घरात जाऊन बसल्या बसल्या
*तोंडात आपोआप बोळा येतो ll

*नवरा म्हणा , वडील म्हणा
*कधी कुणाला कळतात का ?
*त्यांच्या साठी कधी तरी
*कुणाची आसवं गळतात का ? ll

*पेला भर पाणी सुद्धा
*चटकन कुणी देत नाही
*कितीही पाय दुखले तरी
*मनावर कुणी घेत नाही  ll

*वेदनांना कुशीत घेऊन
*ओठ शिउन ' तो ' पडून राहतो
*सर्वांच्या सुखासाठी
*एकतारी भजन गातो  l|

*बायको आणि मुलांनी
*या संताला समजून घ्यावं
*फार काही नकोय त्याला
*दोन थेंब सुख द्यावं    ll

*मग बघा लढण्यासाठी
*त्याला किती बळ येतं
*नवऱ्याचं मोठेपण हे
*किती जणांच्या लक्षात येतं ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

मराठी स्टेटस | mαrαthí ѕtαtuѕ | lσvє ѕtαtuѕ | lєtєѕt mαrαthí ѕtαtuѕ | 1000 mαrαthí ѕtαtuѕ

   मराठी स्टेटस  तू सुंदर दिसतेस त्याला तू काय करणार, प्रेम करतो तुझ्यावर त्याला मी काय करणार, पण काय आहे तुझ्यावर मला कळत नाही तुला पाहिल्य...